पक्षाने सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन - सत्यपाल सिंग
नवी दिल्ली, दि. 04, सप्टेंबर - पक्षाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन, अशी प्रतिक्रिया मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर व्यक्त केली. मंत्रीपदाची संधी दिल्याबद्दल सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचेही आभार मानले आहेत.
शपथविधी नंतर मुंबई पोलिसांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. हा क्षण आमच्यासाठीही आनंदाचा आहे. केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सत्यपाल यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या मनापासून शुभेच्छा, असे ट्विट मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. 2014 साली सत्यपाल यांनी पोलीस प्रशासन सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर काहीच दिवसात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत बागपत येथून ते प्रचंड मतांनी निवडून आले.