Breaking News

मराठा आरक्षण ; 5 सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना

मुंबई, दि. 14, सप्टेंबर - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील 5 सदस्यीय मंत्रिमंडळ  उपसमितीची स्थापना केली आहे. या समितीत परिवहन मंत्री दिवाकर रावते , सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे , जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि  कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा समावेश करण्यात आला आहे. 
9 ऑगस्ट रोजी मराठा ्फे मुंबईत आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चाचे काढण्यात आला होता . त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची मागणी पूर्ण  करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याचे आश्‍वासन मोर्चेकर्‍यांच्या शिष्टमंडळाला दिले होते . आरक्षणाबाबत चालू असलेल्या सरकारी प्रक्रियेसंदर्भात  मराठा समाजाशी समन्वय ठेवण्यासाठी उपसमिती स्थापन केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते . आरक्षणाचा मुदा मागासवर्ग आयोगाकडे सोपविला गेला  आहे . या आयोगाने आपला अहवाल निश्‍चित कालमर्यादेत द्यावा , असेही राज्य सरकारकडून सांगण्यात आले.