उत्तर प्रदेशमधील फारूखाबादमध्येही प्राणवायू व औषधांच्या कमतरतेमुळे 49 बालकांचा मृत्यू
लखनौ, दि. 04, सप्टेंबर - उत्तर प्रदेशच्या फारूखाबादमध्येही प्राणवायू व औषधांच्या कमतरतेमुळे 49 बालकांचा मृत्यू झाला आहे. येथील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील ही घटना असून निष्काळजीपणा व अपुरे उपचार यामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्या अहवालाच्याआधारे दंडाधिका-यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी व राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय सेवा अधिकारी व डॉक्टरांविरोधात कलम 176, 188 व 304 आदींअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या रुग्णालयात 20 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीत हे बालमृत्यू झाले असून त्यातील 19 बालकांचा मृत्यू जन्माच्या वेळीच झाला आहे.तर, अन्य 30 बालकांचा मृत्यू नवजात अतिदक्षता विभागात झाला. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने उपविभागीय दंडाधिकारी व तहसीलदार यांची समिती स्थापन करून या प्रकरणी सखोल तपास केला.