Breaking News

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र सोलापुरात सुरू

सोलापूर, दि. 04, सप्टेंबर - सर्वसाधारण आज बहुतांश लोकांना ह्दयविकार, मधुमेह, रक्तदाब व इतर आजार आहेत. त्यावर माफक दरात औषधे मिळण्यासाठी  सोलापुरात नुकतेच प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र सुरू करण्यात आले आहे.सध्या बदलते वातावरण, पोषक आहाराचा अभाव, व्यायामाचा अभाव व धावती जीवनशैली  यामुळे मनुष्याला बरेच आजार होत आहेत. त्यावर औषधोपचार आहेत. परंतु, ही महागडी औषधे घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्यातली गोष्ट नाही. त्यामुळे  सर्वसामान्यांचा विचार करून भारतात औषधी निर्माण विभाग, रसायन आणि खत मंत्रालय, भारत सरकारतर्फे प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रांची साखळी मोठ्या प्रमाणात  सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापुरात 1 बी, गोल्डफिंच पेठ, नवी पेठ येथे जनऔषधी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या जनऔषधी केंद्रात  हृदविकार, मधुमेह, रक्तदाब, गॅस्ट्रोसह पाचशेहून अधिक आजारांवरील गुणवत्तापूर्ण औषधे माफक दरात उपलब्ध करण्यात आली आहेत. ज्यामध्ये ऐंशी रूपयांची गोळी  येथे सात रूपये, पन्नास रूपयांची गोळी चार रूपये अशा माफक किमतीत मिळणार आहे. त्यामुळे याचा फायदा सर्वसामान्यांनी घेण्याचे आवाहन जनऔषधी केंद्रातर्फे  व भारत सरकारतर्फे करण्यात आले आहे.