Breaking News

सुधागड तालुक्यातील अतिवृष्टीबाधित 250 रहिवाशांना अन्नधान्याचे वाटप

ठाणे, दि. 27, सप्टेंबर - ठाण्यात 29 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये ज्या रहिवाशांच्या घरात पाणी शिरले अशा 250 तालुकावासियांना सुधागड तालुका  रहिवासी सेवा संघाच्या वतीने अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. सुधागड तालुकावासियांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाची 39  वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीराम मंदिर सभागृह, सिद्धेश्‍वर तलाव, हंसनगर, खोपट, ठाणे(प.) येथे संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न  झाली. या सभेस संस्थेच्या सर्व सभासदांसह सर्व रहिवासी उपस्थित होते. 
संस्थेचे सदस्य जयगणेश दळवी यांनी संस्थेचा मागील वर्षीचा कार्य अहवाल वाचून दाखविला. राकेश थोरवे यांनी 2017 चा वार्षिक अहवाल सादर केला तर  खजिनदार विजय पवार यांनी 2016-17 चा जमाखर्च मांडला. या सर्वांना सर्व सदस्यांनी एकमताने मंजूरी दिली. संस्थेचे नवीन आजीव सभासद, संस्थेच्या विविध  उपक्रमात सक्रीय सहभागी असणारे आदीचा सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तर संस्थेची स्वतची वास्तू उभी रहावी संस्था प्रयत्नशील  असून यासाठी तालुकावासियांनी भरघोस देणगी देऊन संस्थेच्या उपक्रमास हातभार लावावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी केले.