‘डीएड’च्या पहिल्या वर्षीच्या परीक्षेत तब्बल 12 हजार 744 विद्यार्थी अनुत्तीर्ण
पुणे, दि. 04, सप्टेंबर - प्राथमिक शिक्षकांसाठी अनिवार्य असलेल्या डीएलएड अर्थात डीएडच्या पहिल्या वर्षीच्या परीक्षेत तब्बल 12 हजार 744 विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले आहेत. डीएलएड अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी मिळत नसल्याची स्थिती आहे. याउलट प्रवेश घेऊनही अनुत्तीर्णाचे प्रमाणही चिंताजनक असल्याचे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या डीएलएडच्या प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर करण्यात आला. पहिल्या वर्षाचा निकाल 24.59 टक्के, तर द्वितीय वर्षाचा 29.12 टक्के इतका लागला आहे. हा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. डीएलएड परीक्षा 1 ते 10 जून या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, निकालाचे मूळ गुणपत्रक अध्यापक विद्यालयामार्फत 20 सप्टेंबर रोजी मिळणार आहेत. गुडपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागणीसाठी अर्ज करण्याचा अंतिम मुदत 16 सप्टेंबरपर्यंत आहे.
डीएलएड प्रथम वर्षासाठी 17 हजार 21 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 4 हजार 185 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णाची टक्केवारी 24.59 आहे. तब्बल 12 हजार 744 विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले आहेत. एटीकेटीप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या शून्य आहे. द्वितीय वर्षाच्या निकालात 7 हजार 329 विद्यार्थी उत्तीर्ण, तर 17 हजार 730 विद्यार्थी अनुत्तीर्ण व एटीकेटीप्राप्त विद्यार्थी आहेत, असे परिषदेकडून सांगण्यात आले आहे.