स्वदेशीसाठी संघाचा समन्वय; परिवारातील विविध संघटनांची बैठक
नागपूर, दि. 07, ऑगस्ट - संघटन कौशल्य हे बलस्थान असलेल्या राष्ट्रीय स्वयं सेवक संघाने स्वदेशीच्या मुद्यावर जनजागृतीसाठी सखोल व्यूहरचना केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघातर्फे परिवारातील विविध संघटनांच्या पदाधिकार्यांशी 6 ऑगस्ट रोजी नागपुरातील रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील महर्षि व्यास सभागृहात आयोजित समन्वय बैठकीत संवाद साधला. यावेळी विदर्भ प्रांतामध्ये राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा मोहीम सुरू असून याला अगदी तळागाळापर्यंत नेण्यात यावे, असे निर्देश संघ पदाधिकार्याकडून देण्यात आलेत.
चीनचे आर्थिक आक्रमण परतवून लावण्यासाठी सर्व संघटनांनी ही मोहीम गंभीरतेने घ्यावी, असे संघातर्फे स्पष्ट करण्यात आले. या बैठकीला भाजपा, स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ, भाजयुमो, अभाविप, ग्रंथालय भारती यांच्यासह संघ प्रेरणेतून कार्य करत असलेल्या विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. महानगर संघचालक राजेश लोया व सहसंघचालक श्रीधर गाडगे हे उद्घाटन सत्रादरम्यान प्रामुख्याने उपस्थित होते व त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आ. अनिल सोले, आ. सुधाकर देशमुख, महापौर नंदा जिचकार यांच्यासह भाजपातील विविध पदाधिकारी उपस्थित होते चीनचा मुद्दा हा देशाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. चीनचे आर्थिक स्रोत बंद व्हावेत यासाठी चिनी वस्तूंच्या विरोधात राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा मोहीम सुरू आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचणे ही स्वयंसेवकांची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व संघटनांनी या मोहिमेत सहभागी होऊन चीनला आर्थिक धक्का दिला पाहिजे, असे लोया यांच्यातर्फे सांगण्यात आले. लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका निवडणुकांतील यशानंतर संघ परिवारातील संघटनांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जास्तीत जास्त जनहिताची कामे होणे अभिप्रेत आहे. यासाठी सर्व संघटनांमध्ये समन्वय प्रभावी असला पाहिजे. त्यामुळे अंतर्गत संवाद व इतर संघटनांशी समन्वय यावर विशेष भर देण्याचे आवाहन करण्यात आले.