Breaking News

काश्मीरमधील चकमकीत एक दहशतवादी ठार; दोन फरार

पुलवामा, दि. 07, ऑगस्ट -  जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील संबुरा येथे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. तर दोन  जखमी दहशतवादी फरार झाले आहेत. घटनास्थळाहून सुरक्षा दलाच्या जवानांनी एक एके-47 ही जप्त केली आहे.
संबुरा परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलाच्या जवानांनी रविवारी रात्री परिसराला घेराव घालून शोध मोहिमही सुरू केली.दहशतवाद्यांकडून  जवानांवर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर जवानांनी प्रत्युत्तर देत तीनही दहशतवाद्यांना घेरले. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. तर जखमी  झालेले दोन दहशतवादी फरार झाले आहेत. अयूब ललहारी आणि रहमान अशी फरार दहशतवाद्यांची नावे आहेत. या दोघांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू  करण्यात आली आहे. यामुळे येथील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.