सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना इंदूर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
इंदूर, दि. 24, ऑगस्ट - सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मध्य प्रदेशमधील इंदूर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. न्यायमूर्ती वेद प्रकाश शर्मा यांनी याबाबतचे आदेश दिले. शासकीय कार्यात अडथळे निर्माण करण्याच्या आरोपाखाली धार जिल्ह्यातील कुक्षी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.
पाटकर यांचे वकिल आनंद मोहन माथुर यांनी सांगितले की, सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी उपोषणास बसलेल्या मेधा पाटकर यांच्या विरोधात 1 ऑगस्ट रोजी धार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर आज न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.