पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही साजरे केले रक्षाबंधन
नवी दिल्ली, दि. 07 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रक्षाबंधनानिमित्त देशातील नागरिकांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. रक्षाबंधनानिमित्त वृंदावनमधील मीरा सहभगिनी आश्रमातील काही विधवा महिलांनी 1 हजार 500 राख्यांसह पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या राख्यांवर पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे.
रक्षाबंधनानिमित्त आज पंतप्रधान मोदी यांची मानलेली पाकिस्तानी बहिण कमर मोहसिन शेख या दिल्लीमध्ये दाखल झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते तेव्हापासून मी त्यांना राखी बांधते आहे, असे त्यांनी सांगितले. कमर शेख यांचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला. मात्र त्या भारतात वास्तव्यास आहेत.
त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी हे सुरूवातीपासूनच खूप मेहनती आहेत. तसेच त्यांच्याकडे दूरदृष्टीही आहे. त्यांच्या या गुणांमुळेच ते आज पंतप्रधान पदावर विराजमान आहेत. पंतप्रधान मोदी हे आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे ते मला रक्षाबंधानानिमित्त भेटतील की नाही याचा विचार करत होते. मात्र त्यांनी दोन दिवसांपूर्वी मला रक्षाबंधनाची आठवण करुन दिली असल्याचे कमर शेख यांनी नमूद केले.