राज्य आदिवासी साहित्य संमेलनाध्यक्षपदी तुकाराम रोंगटे
जळगाव, दि. 07 - चाळीसगाव येथे रविवारी चवथ्या राज्यसदिवासी साहित्य संमेलनाबाबत आदिवासी साहित्य अकादमीची बैठक घेण्यात आली. यावेळी पुणे विद्यापीठातील मराठी भाषा प्रमुख डॉ.तुकाराम रोंगटे यांची संमेलनाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या या संमेलनाच्या नियोजनाबाबत कवी वाहरु सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. अनेक विद्यापीठात व महाराष्ट्र साहित्य निर्मिती मंडळाकडून आदिवासी साहित्यात इतर साहित्य घुसडून त्याचे विद्रुपीकरण होत असल्याबद्दल निषेधाचा ठराव केला. हा ठराव डॉ.संजय लोहकरे यांनी मांडला. हे साहित्य संमेलन मेहुणबारे येथे घेण्याविषयी कवी सुनील गायकवाड यांनी विचार मांडले. याच वेळी राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संमेलनाचा लोगो प्रकाशन जि.प. सदस्या मोहिनी गायकवाड, वाहरु सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनात परिसंवाद, कथाकथन, कवी संमेलन, ग्रंथदिंडी व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन आहे. बैठकीत डॉ.वाल्मिक अहिरेंचा पीएचडी मिळाल्याबद्दल सत्कार झाला. तसेच नवनिर्वाचित आदिवासी पं.स. सदस्य व जि.प. सदस्यांचाही गौरव केला. विश्वास पाडोळसे, अनिल पवार, दिनेश चव्हाण, डॉ.संजय लोहकरे, राकेश खैरनार, प्रा.जितेंद्र सोनवणे, संजय बहिरम, विजय गायकवाड, गौतमकुमार निकम, एकनाथ गोफणे, संजय सोनार, रमेश पोतदार, रतन मोरे, एल.टी.सोनवणे, सुनील गायकवाड, एन.आर.पाटील, ललिता पाटील, भगवान जगताप, कल्पना गायकवाड आदी उपस्थित होते. बोली भाषा समन्वयक म्हणून रमजान तडवी व एकनाथ गोफणे यांची निवड केली. संमेलनात 1001 रुपयाचा वाहरु भाऊ साहित्य पुरस्कार दिला जाणार आहे.