Breaking News

कॅन्सर शिबिराचा सिव्हिलमध्ये उत्साहात समारोप

जळगाव, दि. 07 - येथील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार सल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कँन्सर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . त्याचा  आज जिल्हा रुग्णालयात उत्साहात सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप करण्यात आला . 
दरम्यान वॉरियर संघटनेचे सदस्य डॉ.. निलेश चांडक यांची कॅन्सरप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन त्यांची जळगाव व अकोला येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात  मोफत कर्करोग निदान व उपचार सुविधा केंद्र सुरु करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना आरोग्य सेवा संचनालयचे सह संचालक यांनी पत्र पाठवून त्यांची  नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
यामुळे कर्करोग रुग्णांमध्ये समाधानाचे वातवरण असून डॉ. निलेश चांडक हे महिन्याच्या प्रत्येक दुसर्या व चौथ्या बुधवारी सेवा देणार आहेत .
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यात 80 रुग्नांची तपासणी  करून यातील 10 रुगणांवर मोफत शस्त्रक्रिया डॉ. निलेश चांडक यांनी केल्या* त्यांना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील ,मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद  गोसावी , जी.एम. फाऊडेशनचे अरविद देशमुख,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र कदम,जिल्हाध्यक्ष भगवान सोनार ,एस.पी.  गणेशकर,डॉ. श्रीधर पाटील,डॉ. मेहुल पटेल,इफ्तेकार अजीज ,मनोज सपकाळे , ललित खरे आदींचे सहकार्य लाभले . समारोपावेळी सहकार राज्य मंत्री ना.  गुलाबराव पाटील यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबाबत गौरवोद्गार काढत शिबीर आयोजनाचा समारोप केला.