Breaking News

उत्तर प्रदेशनंतर आता बिहारमधील बेकायदा कत्तलखानेही बंद होण्याची शक्यता

पाटणा, दि. 07, ऑगस्ट -  उत्तर प्रदेशनंतर आता बिहारमधील बेकायदा कत्तलखानेही बंद होण्याची शक्यता आहे. बिहारचे पशु व मत्स्यव्यवसाय मंत्री पशुपति  कुमार पारस यांनी येथील 140 बेकायदेशीर कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिल्याचे समजते. मी खात्याच्या सचिवांना राज्यातील सर्व कत्तलखान्यांचा अहवाल  सादर करण्यास सांगितले असून त्यातून परवानाधारक व बेकायदा कत्तलखान्यांची माहिती समोर येईल, असे त्यांनी सांगितले.
पशु व मत्स्यव्यवसाय खात्यातील अधिका-यांनी सांगितले की, केवळ दोन कत्तलखान्यांच्या मालकांकडे परवाने आहेत. माजी पशु व मत्स्यव्यवसाय मंत्री अवधेश  कामर सिंग यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांकडे बेकायदेशीर कत्तलखान्यांची माहिती मार्च पर्यंत सोपवण्याचे आदेश दिले होते. भोजपूर जिल्ह्यातील  रानीसागरमध्ये बेकायदा कत्तलखाने बंद करून तिघांना अटक करण्यात आली . त्याशिवाय गुरूवारी येथील शाहपूर भागात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह काही  स्थानिकांनी गोमांसाची विक्रि होत असल्याची तक्रार केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर बिहार सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते.