उ. कोरियावर कडक प्रतिबंध लादण्याबाबतच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र संघात मंजूरी
वॉशिंग्टन, दि. 07, ऑगस्ट - विरोध डावलून वारंवार अण्वस्त्र चाचणी करणा-या उत्तर कोरियावर कडक प्रतिबंध लादण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात मंजूर करण्यात आला आहे. अमेरिकेने मांडलेल्या प्रस्तावाला सर्व सदस्य राष्ट्रांनी मंजूरी दिल्याने आता उत्तर कोरियातून होणा-या निर्यातीवर प्रतिबंध घातेल जाणार आहेत. यामुळे त्यांचे वर्षाला 1 अब्ज डॉलर इतके नुकसान होणार आहे. जुलै महिन्यात उत्तर कोरियानेआंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाइल परीक्षण केले होते. त्यानंतर अमेरिकेने प्रस्तावाचा मसुदा तयार केला होता.
प्रस्तावानुसार मासे व समुद्री खाद्यपदार्थ, कोळसा, लोह इत्यादींच्या निर्यातीवर निर्भर असलेल्या उत्तर कोरियाला आता निर्यात करता येणार नाही.तसेच या प्रस्तावामुळे विदेशात काम करणा-या उत्तर कोरियातील कामगारांच्या संख्येतील वाढ, नव उद्योजक व सध्या असलेल्या संयुक्त उपक्रमांमधील नवीन गुंतवणूक आदींवर प्रतिबंध घातले जाणार आहेत.