चांडक विद्यालयात राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात
बुलडाणा, दि. 31, ऑगस्ट - येथील लीलाधर भोजराज चांडक विद्यालयात 29 ऑगस्ट रोजी स्व.मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनामित्त विविध क्रीडा स्पर्धा घेवून राष्ट्रीय क्रीडादिन उत्साहात साजरा करण्यात आला. 29 ऑगस्ट हा स्व.मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याच धर्तीवर लीलाधर भोजराज चांडक विद्यालय, मलकापूर येथे 29 ऑगस्ट रोजी रस्सीखेच, संगीत खुर्ची, स्लो सायकल, लिंबू-चमचा अशा विविध स्पर्धांना उपप्राचार्य राजूरकर, ज्येष्ठ पर्यवेक्षक पवार यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. एकूण 1100 विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. सर्व क्रीडा शिक्षक, विषय शिक्षक, शिक्षिका यांनी विशेष मार्गदर्शन केल्यामुळे स्पर्धा अतिशय यशस्वीरित्या पार पडल्या. स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक गणेश तायडे, विक्रांत नवले, तोमर यांनी मोलाची कामगिरी बजावली. सर्व विद्यार्थ्यांनी खेळाचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी संपूर्ण परिसर क्रीडामय झाला होता.