Breaking News

सुधागड तालुका कुपोषणमुक्त करण्याचा कोकण पदवीधर संस्थेचा निर्धार

ठाणे, दि. 23, ऑगस्ट - दोन वर्षाच्या अखंड परिश्रमानंतर यतालुका कुपोषणमुक्त करणारङ्क या कोकण पदवीधर संस्था आणि सुधागड प्रतिष्ठान ठाणे  यांच्या संयुक्त विद्यमाने निर्धाराच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल पुढे सरकले आहे. नुकतेच पाली पंचायत समितीच्या कार्यालयात एडीओ विनायक म्हात्रे,  सीडीपिओ शंकर कवितके यांच्या समवेत एक अतिशय सकारात्मक बैठक झाली. त्यांनी संस्थेने सादर केलेल्या उपक्रमाचे स्वागत तर केलेच शिवाय सर्व  तऱहेने सहकार्य करण्याचे आश्‍वासनही दिले. 
सुरूवातीला जांभुळपाडा परिसरातील 50 कुपोषित बालकांना सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभागातर्फे एक कृती आराखडा तयार करून साधारणत  ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्याचे ठरविण्यात आले आहे. सदर बैठकीस कोकण पदवीधर संस्थेच्यावतीने अध्यक्ष डॉ. अशोक  मोडक, कार्याध्यक्ष डॉ. वसंत काणे, सदस्य सुभाष खासनीस, सुधागड प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सदाशिव लखिमळे, डॉ. आदिती भिडे, समन्वयक दंतबाई,  कैलाश दळवी, भाई लखिमळे आदी मान्यवरांनी भाग घेतला. सदर बैठक यशस्वी करण्यासाठी सुधागड प्रतिष्ठानचे कार्यकर्ते शिवाजी ठुले, संदीप जाधव,  प्रदीप धनावडे, सिताराम थोरवे, राजेश बामणे यांनी प्रयत्न केले.