अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी महाअवयवदान महोत्सव
नाशिक, दि. 23, ऑगस्ट - अवयवदानाला चालना मिळावी आणि त्याबाबृती व्हावी यासाठी 29 आणि 30 ऑगस्ट 201 रोजी महा अवयवदान महोत्सव-2017 आयोजित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
महोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरात जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 29 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेऊन अवयवदानाची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. घरासमोर अवयवदान जागृतीसाठी रांगोळी काढून या उपक्रमाला खर्या अर्थाने महोत्सवाचे स्वरुप देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
शाळा आणि महाविद्यालयातून रांगोळी, निबंध, वक्तृत्व स्पर्धा तसेच व्याख्यान आणि चर्चासत्रांचे आयेाजन करण्यात येणार आहे. शांतता समिती, गणेशोत्सव मंडळांचादेखील सहभाग जनजागृतीसाठी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. गणेशोत्सवादरम्यान अवयवदानाचे फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत.
नाविन्यपुर्ण तंत्रज्ञानाच्या आधारे मानवी अवयव प्रत्यारोपणाद्वारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. अवयवदानाद्वारे अनेकांना नवे जीवन देता येणे शक्य आहे. याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षीदेखील अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. अभियनाच्या माध्यमातून चांगली जनजागृती करण्यात आली होती. या प्रयत्नांना चालना देण्यासाठी यावर्षी महा अवयवदान महेात्सव आयोजित करण्यात आला आहे.