Breaking News

पंतप्रधान मोदी यांच्या दौ-यानंतर इस्त्रायलला जाणार्‍या भारतीय पर्यंटकांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली, दि. 27, ऑगस्ट - पंतप्रधान मोदी यांच्या दौ-यानंतर इस्त्रायलला जाणार्‍या भारतीय पर्यंटकांच्या संख्येत 26 टक्क्यांनी वाढ झाल्याचे इस्त्रायलच्या वरिष्ठ  अधिका-यांकडून सांगण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इस्त्रायलच्या ऐतिहासिक दौ-यानंतर भारतीय नागरिकांमध्ये इस्त्रायलबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मागील सात  महिन्यांमध्ये 34 हजार पेक्षा अधिक भारतीयांनी इस्त्रायल दौरा केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौ-यामुळे इस्त्रालयबाबत सकारात्मक दृष्टीकोन नागरिकांमध्ये  निर्माण झाला आहे, असे इस्त्राइलच्या पर्यटन मंत्रालयाचे संचालक हसन मदाह यांनी सांगितले.
ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या दौ-यामुळे दोन देशांनी एकमेकांबरोबर व्यवसाय केल्यामुळे होणा-या फायद्याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. यामुळे  व्यावसायिक प्रवाशांची संख्या आपोआप वाढेल. येथील सकारात्मक वातावरणामुळे इस्त्रायल पर्यटनाच्या क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल. तसेच नवी दिल्लीहून  इस्रायलला थेट विमान सेवा सुरू झाल्यामुळे पर्यटन क्षेत्राचा विकास वेगाने होईल, असे त्यांनी नमूद केले.