बंदिजनांच्या शैक्षणिक विकासासाठी मुक्त विद्यापीठ कटीबद्ध - कुलगुरू वायुनंदन
नाशिक, दि. 07 - जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे अपर्धेच्या युगात जगाशी सामना करण्यासाठी कौशल्याधीष्ठीत शिक्षणाबरोबरच मूल्य शिक्षणही आवश्यक आहे. मुक्त विद्यापीठाने यावर्षापासून राज्यातील बंदिजनांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी विद्यापीठ कटीबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या सहकार्याने बी.ए. मूल्य आणि अध्यात्मिक पदवी शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या बंदिजनांना कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांच्या हस्ते पदवी देवून सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नाशिक मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक राजकुमार साळी, तुरंग अधिकारी वामन निमजे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी अशोक कारकर, संतोष कोकणे, विष्णू राठोड, ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी, विद्यापीठाचे प्रभारी जनसंपर्क अधिकारी संतोष साबळे, ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी आणि यशब्रह्माचे नोडल सेंटर अधिकारी विकास साळुंखे हे होते.
प्रा. ई. वायुनंदन म्हणाले, शिक्षण हे मानवीय सत्याची प्रगती, परिवर्तन आणि प्रेरणा यांचे आधार स्तंभ आहे. शिक्षणाचा खरा आधारस्तंभ मूल्य शिक्षण आहे. मूल्य शिक्षणाच्या आवश्यकतेबद्दल असलेली नवी शैक्षणिक जागृती होताना दिसत आहे. मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यातील सर्व कारागृहांत शिक्षणाची ज्ञानगंगा विनामूल्य पोहचविण्यात येणार असून बंदिजनांना बाहेर पडल्यानंतर समाजात वावरताना मान, सन्मानासोबतच उच्च शिक्षणामुळे नोकरी आणि व्यवसायाच्या संधी मिळू शकतील. राजकुमार साळी म्हणाले, शिक्षण हेच मनुष्याची वैचारिक पातळी किती चांगली आहे हे ठरविण्यास मदत करते आणि त्यामुळे जीवनात लक्ष्य प्राप्ती होते.
या समारंभात सदगुणांची राखी हा रक्षाबंधनाचा कार्यक्रमही साजरा करण्यात आला. सर्व बंदिजनांना सदगुणांची राखी बांधण्यात आली. ब्रह्माकुमारी गोदावरी दिदी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यशब्रह्मा नोडल सेंटर अधिकारी विकास साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले.