भुजबळ यांच्यावर सरकारकडून सूडबुद्धीने कार्यवाही; समता परिषदेकडून बैठकीत रोष व्यक्त
नाशिक, दि. 07 - छगन भुजबळ यांच्यावर सरकारकडून सूडबुद्धीने कार्यवाही होत असल्याने समता परिषदेच्या बैठकीत रोष व्यक्त करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय महात्मा समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, उपाध्यक्ष बापू भुजबळ, डॉ.कैलास कमोद, दिलीप खैरे, आमदार जयवंतराव जाधव, रवींद,पार्वतीबाई शिरसाठ, शिवजीराव नलावडे, डॉ.डी.एन.महाजन, प्रा.दिवाकर गमे, अॅड.बाबुराव बेलसरे, अॅड.सुभाष राऊत, अंबादास गारुडकर, किशोर कन्हरे, प्रितीश गवळी, सुशीलकुमार जाधव, डॉ.संजय गव्हाणे, बाळासाहेब कर्डक, मनोज घोडके, विनायक डहाके, नीलकंठ पिसे, दत्ता खरात, आदींसह राज्यभरातील जिल्हाध्यक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बैठकीत निशुल्क सभासद नोंदणी कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला असून संघटना आणखी मजबूत करण्यासाठी चर्चा करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, डॉ, कैलास कमोद, बापू भुजबळ, अॅड.बाबुराव बेलसरे, दत्ता घाडगे , पार्वतीबाई शिरसाठ आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
राज्य व केंद्र सरकार कडून ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. ही बंद झालेली शिष्यवृत्ती सुरु करून त्यांना ती लवकरात लवकर देण्यात यावी. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतील संघटनात्मक बदल करून संघटना मजबूत करणे, ओबीसीच्या प्रश्नावर जिल्हा पातळीवर मोर्चे,आंदोलने, निदर्शने करण्यात यावे याबाबत बैठकीत मांडण्यात आले. दरम्यान 1 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेला 25 वर्ष पूर्ण होत असून रौप्य महोत्सवी वर्षा च्या तयारी संबधी चर्चा करण्यात आली तसेच सदर मेळावा मराठवाड्यात घेण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.