अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलने आयोजन
औरंगाबाद, दि. 23, ऑगस्ट - मुस्लिम मराठी साहित्य चळवळ संघटीत होऊन गेल्या 3 दशकापासून कार्यरत आहे. चळवळीद्वारे अनेक ठिकाणी शिबिरे, चर्चासत्रे, परिसंवाद,कविसंमेलने, मुशायरे, व्याख्यानमाला आणि अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्यात येतात. गेल्या 3 दशकात चळवळीची 10 अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलने महाराष्ट्राच्या विविध आणि प्रमुख शहरात यशस्वी झाली आहेत. मुस्लिम बांधवानी विविध भाषात, विविध विषयांवर विविध माध्यमातून अभिव्यक्त व्हावे यासाठी मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ कार्य करत आहे.
सद्या विश्वातील विविध देशात 200 कोटीच्यावर आणि विश्वजनसंख्येच्या 24 टक्क्यांवर मुसलमान आहेत. ते ज्या देशात आहेत तिथली संस्कृती, तिथली भाषा, तिथले रिती रिवाज आणि परंपरा जपत त्या त्या देशाच्या विकासात आपला हिस्सा नोंदवत आहेत. परंतु अलिकडच्या दोन दशकात आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लिमांची मलीन केलेली प्रतिमा , त्यांच्यावर होणारे आरोप यामुळे जागतिक स्तरावर मुस्लिम चिन्ताक्रान्त आणि अस्वस्थ आहेत. आपल्या भावितव्याबद्धल संभ्रमित आहेत. स्वतःचा चेहराच पुसून जाण्याची त्यांना धास्ती वाटते. ही गोष्ट लक्षात घेवून मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाने औंरंगाबादेत चर्चासत्र आयोजित केले आहे. या चर्चासत्रामध्ये मुस्लिम समाज: साहित्य आणि संस्कृति या मुख्य विषयावर आणि त्यावरील उपविषयावर सामाजिकशास्र, कला, शिक्षणशास्त्र आणि अन्य विद्याशाखांच्या तदन्याकडून, प्राध्यापकांकडून, संशोधकांकडून, अभ्यासकांकडून, समाजशास्त्रदन्याकड़ून शोध निबंध मागवण्यात येत आहेत, असे संयोजक इकबाल मिन्ने यांनी कळविले आहे.