गोवा पोटनिवडणूक : पणजीतून पर्रिकर विजयी; वाळपईतून राणेंचा दणदणीत विजय
पणजी, दि. 28, ऑगस्ट - गोव्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवला. पणजी या प्रतिष्ठेच्या मतदारासंघातून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे 4,803 मतांनी विजय झाले. पर्रिकर यांना 9,862 तर काँग्रेसचे गिरीश चोडणकर चोडणकर यांना 5,059 मते मिळाली. गोवा सुरक्षा मंचचे आनंद शिरोडकर यांना अवघी 220 मते मिळाली. भाजपतर्फे मुख्यमंत्री पर्रिकर सलग सहाव्यांदा पणजीत विजयी झाले आहेत. वाळपईतून आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी तब्बल 10,066च्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे रॉय नाईक यांचा पराभव केला. राणे यांना 16,167 तर रॉय नाईक यांना 6,101 मते मिळाली. त्यामुळे 40 सदस्यीय गोवा विधानसभेत भाजपचे संख्याबळ आता 14 झाले आहे.