मुखी जपावे रामा, शय्येला असावी रमा
दि. 28, ऑगस्ट - रामाने वनवास सोसला. वारसांनी भोग भोगला.राम राज्यात सीतेला अग्नीपरीक्षा द्यावी लागली. कलीयुगातील रामाचे वारस सीतेला खुलेआम भोगू लागले.दहा वीस टक्यांवर धंदा करणारा सावकारी राम असो नाही तर नावाचे पाल पांघरूण भौतीक सुख लुटणारा रामपाल असो, अथवा सच्चा सौदा नावावर खोटारडे बाजारी धंदे करणारा चांडाळ असो.. ही सारी मंडळी रामाचे नाव खर्या अर्थाने उज्वल करीत आहे.दोष द्यायचा तर कुणाला द्यायचा?धर्माचे मार्तंड माजविणारी व्यवस्था आणि बुध्दी गहाण ठेऊन डोळ्यांची खाचरं बनविलेल्या मुर्दाड अंध भक्तांचे हे पाप समाज शोषणाला प्रेरीत करीत आहे.
बाबा शरण, राधे माँ अशा काही देवदलालांचे कुट कारनामे चव्हाट्यावर आल्यानंतर धर्मच नव्हे तर चर्चीत तेहतीस कोटी देवांच्या सार्या पिढ्यां महासागरात बुडण्याची भीती निर्माण करून समाजाच्या श्रध्देचा लिलाव करणारी पाताळ यंत्रणा समाजव्यवस्थेसाठी मानवी बाँब असल्याचा प्रत्यय सच्चा सौदा डेरा प्रकरणानंतर पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
सच्चा सौदा डेराचा मुखिया बाबा राम रहीम हा एकमेव हरामी समाजाची लूट करतो असे नाही तर या हरामी कार्यशैलीच्या असंख्य भुतावळी समाजाच्या छाताडावर नाचत आहेत. महाराष्ट्रात यापुर्वी बलात्काराच्या गुन्ह्यात, सरकारी नोकरीत भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी असलेले महाभाग आज आचार्य बनून समाजाचे शोषण करीत आहेत, बुवाबाजीने समाजाची मान आवळली जात असतांना एका बाजूला भोंदूच्या लिला चव्हाट्यावर आणण्याची जबाबदारी नैतिकतेचा टेंभा मिरवणार्या ज्या ज्या घटकांवर आहे,ती मंडळी देखील जनप्रवाहाला प्रबोधित करण्याऐवजी स्वतःचे महत्व अधोरेखित करण्याच्या (टीआरपी) मोहाला बळी पडून भोंदूगीरीचे उत्थान करू पाहतात. आज माध्यमं प्रगल्भ झाली आहेत. प्रगल्भता वाढल्याने समाजाला शिकवून शहाणं करण्याची जबाबदारी वाढली आहे याचं भान मात्र टीआरपीच्या खळाळत्या प्रवाहासोबत वाहू लागले आहे. अशा प्रवृत्तींना नको तेव्हढी प्रसिध्दी देतांना आपला गल्ला भरणारा धंदेवाईक विचार करणारी माध्यमं राधे माँ चा अर्ध नग्न नाच दाखवितांना जारा देखिल लाज बाळगत नाहीत. समोशासोबत गोड चटणी मटके मारत मारत बाबांच्या निर्मल भक्तीचे गोडवे गाणार्या भक्तांनी अनुभवलेल्या चमत्कारांचे लाईव्ह दाखविण्याचे पाप या बुवाबाजीला प्रोत्साहन देत असल्याचे तारतम्य बाळगले जात नाही.
समाज दुःखाच्या खाईत सडत आहेत. भौतिक प्रदुषणाच्या अतिक्रमणामुळे मानसिक शांती हरवून बसला आहे. सुखाच्या शोधात निघालेला समाज बुवाबाजीच्या जाळ्यात अडकतो आणि मग जाळे फेकणारे भोंदू त्याचे लचके तोडतात.विरोध करणार्या दुर्दैवी जीवांचे कोण हाल केले जातात याची अनेक उदाहरणे आसाराम, रामपाल, राम रहिम या मंडळींच्या आश्रमातून जगासमोर आली आहेत.
खरे तर या मंडळींना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. देवऋषींचा चेहरा घेऊन राक्षसी प्रवृत्ती पोसणार्या या नराधमांकडून या पेक्षा वेगळी अपेक्षा ठेवता येणार नाही. त्यांच्या मगरमिठीत अडकलेला समाज काही अंशी दोषी म्हणता येईल. मात्र खरे दोषी आहोत तुम्ही आम्ही. समाजात उजळ माथ्याने प्रबोधनाचे ठेकेदार म्हणून वावरणारे, जनकल्याणाचा ठेका घेतलेली व्यवस्था आणि या सर्वांवर अंकुश म्हणून कार्यरत असलेली माध्यम प्रणाली जर भोंदू बुवा गीरीच्या चरणी आपली टोपी ठेवून माथा टेकवणार असेल, आचार्य गुरूंजीची पादत्राणे प्रसाद म्हणून चाटणार असेल तर मुखी जपावे रामा, शय्येला असावी रमा अशा प्रवृती शिरजोर झाल्या तर दोष कुणाचा!