कृषी विभागाने शेतकर्यांच्या सेवेची संधी सोडू नये - डॉ. सुभाष भामरे
धुळे, दि. 23, ऑगस्ट - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांना केंद्रबिंदू मानले आहे. गरीब, शेतकर्यांचे कल्याण हाच त्यांचा ध्यास आहे. त्यांनी शेतकर्यांच्या विकासासाठी विविध योजना आणल्या आहेत. या योजनांचा लाभ कृषी विभागाने सामान्य शेतकर्यांपर्यंत पोहोचवीत आगामी पाच वर्षांत शेतकर्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचा संकल्प करावा. शेतकर्यांच्या सेवेची संधी सोडू नये, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले.
कृषी महाविद्यालयात कृषी विज्ञान केंद्र व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंडिया मंथन : संकल्प ते सिध्दी या कार्यक्रमाचे उदघाटन आज सकाळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील विस्तार शिक्षण विभागाचे संचालक डॉ. किरण कोकाटे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.यशवंत फुलपगारे, नाबार्डचे महाप्रबंधक विवेक पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्या हस्ते मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण, कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण, संकल्प ते सिध्दी पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच दिलीप पाटील, संदीप भामरे, तवरसिंग राजपूत, निमेश महाजन, समाधान बागूल, प्रकाश पाटील, जयपाल गिरासे या शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. भामरे यांनी उपस्थितांना सुराज्य आणण्याचा संकल्प करण्याची शपथ दिली. तत्पूर्वी त्यांनी विविध स्टॉलची पाहणी केली.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले, धुळे जिल्ह्यातील शेतकरी अतिशय कष्टाळू आहे. काम करण्याची त्यांच्यात ताकद आहे. त्याला वीज, पाणी, शेतमालाला योग्य भाव आणि शेतीला पूरक जोड व्यवसाय केला, तर तो प्रगती करू शकेल. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विकासासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. या योजना कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाने प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकर्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविल्या पाहिजेत. कृषी विभागाला शेतकर्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा लाभ घेत कृषी विभागाने सामान्य शेतकर्यापर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवावेत.
शेतकर्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. जमिनीच्या आरोग्यपत्रिका तयार करुन घ्यावी. शास्त्रोक्त व आधुनिक पध्दतीने शेती करीत शेतकर्यांनी प्रगती साधावी. सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आगामी काळात शेतीला पाणी उपलब्ध होवू शकणार आहे. तसेच आगामी काळात कोल्ड स्टोरेज आणण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. त्यामुळे कांद्यासारखा शेतमाल तेथे ठेवता येईल आणि योग्य दर मिळाल्यावर शेतकरी त्याची विक्री करू शकेल, असेही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे म्हणाले, दारिद्ररेषेखालील घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्यांचा लाभ घेतला पाहिजे. शेतकर्यांनी पीक विमा योजनेत सहभागी झाले पाहिजे. शेतकर्यांनी जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करुन त्यानुसार खतांची मात्रा ठरविली पाहिजे. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत घडविण्यासाठी आपापली गावे हागणदारीमुक्त केली पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले. डॉ.कोकाटे म्हणाले, बदलत्या हवामानाचे आव्हान स्वीकारुन शेतकर्यांना शेती करून उत्पन्न वाढवायचे आहे. शेतीतील नफा वाढविण्यासाठी शेतकर्यांनी सेंद्रीय पध्दतीने शेती करावी, असेही त्यांनी सांगितले. सेंद्रीय पध्दतीने शेती करणारे आणि सेंद्रीय शेतीचे प्रचारक दिलीप पाटील यांनीदेखील यावेळी मनोगत व्यक्त केले.
सहयोगी अधिष्ठाता डॉ.फुलपगारे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले, शासनाच्या योजनांचा लाभ घेत शेतकर्यांनी उत्पादन वाढविले पाहिजे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला संकल्प सिध्दीस न्यावा, असेही त्यांनी नमूद केले. जगदीश काथेपुरी, रमेश पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.