मोरबे धरणात मुबलक पाणीसाठा
नवी मुंबई, दि. 07 - महापालिकेच्या मोरबे धरण क्षेत्रात यंदा चांगला पाऊस पडल्याने धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यावर्षी नवी मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार नाही. 88 मीटर पर्यंत धरण पाण्याने भरले आहे.
मुंबई महापालिकेनंतर नवी मुंबई महापालिकेला स्वत:चे धरण आहे. पूर्वी धरण नसल्यामुळे अन्य प्राधिकरणांकडून मिळणा-या पाणी पुरवठ्यावर नवी मुंबईकरांना अवलंबून रहावे लागत होते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी कापत होऊन पाणी वितरणाच्या नियोजनाचे बारा वाजत होते. परिणामी महापालिकेच्या अनेक महासभा या पाण्यावर गाजल्या होत्या. मात्र मोरबे धरण घेतल्यापासून नवी मुंबईकरांची पाण्याची समस्या निकालात निघाली आहे. या धरणामुळे गेल्या काही वर्षांपासून मागील वर्षे वगळता कधी पाणी कपातीला सामोरे जावे लागले नाही. मागील वर्षी धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस पडला नव्हता, तरी शिल्लक पाणी साठ्यामुळे नोव्हेंबर 2017 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा झाला होता. यंदा मात्र पावसाने धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे 86 मीटरपर्यंत धरण भरले आहे. मागील वर्षी जुलै अखेर 76 मीटरपर्यंत धरण भरले होते. मागील वर्षी सप्टेंबर अखेर धरणात 167 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा झाला होता. धरणाचा ओव्हर फ्लो 88 मीटरला आहे. त्यामुळे पूर्ण धरण भरण्यास केवळ 2 मीटर शिल्लक राहिल्याने यंदाच्या पावसाळ्यात धरण भरण्याचा विश्वास अधिका-यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे 2013 साली धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडून धरण ओव्हर फ्लो झाले होते त्यांनतर गेली चार वर्षे धरण ओव्हर फ्लो झाले नव्हते. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन व महापौर सुधाकर सोनावणे यांनी नुकतीच या धरणाची पहाणी केली होती. त्यानुसार सध्या धरणात 171.76 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी नवी मुंबईकरांवरील पाणी संकट तुर्तास तरी टळल्यात जमा आहे.