अभिनेता सुमित राघवन याच्यावर खासदार चंद्रकात खैरे यांची टीका
औरंगाबाद, दि. 07 - अभिनेता सुमित राघवन याने औरंगाबादच्या संत एकनाथ रंगमंदीराच्या दुरावस्थेवर टीका केल्यानंतर औरंगाबगदचे खासदार चंद्रकात खैरे यांनी चिडून राघवनवरच तोफ डागली असून सवलतीच्या घरांची मागणी करताना सगळेच कलाकार एकत्रित येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतात. त्यांनीच रंगमंदीराच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावीै दिली. संत एकनाथ रंगमंदिराची काळजी घेणे फक्त नेते आणि महापालिकेची जबाबदारी नाही.टीका करण्यापेक्षा या कलाकरांनी काही तरी सकारात्मक कृती करावी, असे ते महणाले. खैंरेंच्या या वक्तव्यामुळे मुळ प्रश्न बाजुला राहून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.राघवन याचा एकनाथ रंगमंदीरातील दुरावस्थे बाबत टीका करणारा व्हिडीओ फेसबुकवर फिरत आहे.