पंतप्रधान मोदी यांच्या ’न्यू इंडिया’ संकल्पनेकडे नेणारा हा सकारात्मक निर्णय - विजया रहाटकर
मुंबई, दि. 23, ऑगस्ट - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सर्वोच्च न्यायालयाने आज तिहेरी तलाक बाबत दिलेल्या निकालाच स्वागत केल आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, आजच्या निकालाने मुस्लिम महिलांच्या दीर्घ लढ्याला मोठे यश आलं आहे. हा निर्णय मुस्लिम महिलांसाठी स्वाभिमानपूर्ण व समानतेच्या नव्या युगाची सुरुवात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’न्यू इंडिया’ या संकल्पनेकडे नेणारा हा सकारात्मक निर्णय आहे. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारने न्यायालयात मांडलेल्या न्याय्य व विवेकपूर्ण भूमिकेसाठी आभार व्यक्त करते. केंद्र सरकारने समग्र कायदा करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे न्याय देणारा कायदा लवकरच पुढे येईल. यंत्रणा संवेदनशील असल्याचं हे उदाहरण आहे.
याआधी न्यायालयात केंद्र सरकारनेही तिहेरी तलाक पद्धतीविरुद्ध भूमिका घेतली आहे. तिहेरी तलाक वैध असल्याचे केंद्र सरकार मानत नाही. तसेच ही पद्धती सुरू राहावी, असेही सरकारला वाटत नसल्याचे केंद्राने याआधीच आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारची या प्रश्नांबाबतची भूमिका स्पष्ट आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने देखील विविध उपक्रमांमधून मुस्लिम महिलांची मानसिकता जाणून घेत अन्यायी प्रथे विरुद्ध उभं राहण्यासाठी मानसिक बळ दिलं असल्याचं ही त्या म्हणाल्या.