Breaking News

गणेशोत्सवाच्या निमित्ताने पिंपरी पालिकेतर्फे विशेष स्वच्छता मोहीम

पुणे, दि. 23, ऑगस्ट - गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका विशेष स्वच्छता  मोहीम अभियान राबवित आहे. या अभियानात शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, महापौर नितीन काळजे व आयुक्त श्रावण  हार्डीकर यांनी केले आहे. शहराच्या विविध भागात पालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये एकूण 153 कर्मचारी सहभागी झाले होते.  परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत सुमारे 1930 किलो कचरा उचलण्यात आला.’अ’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील प्र. क्र. 15 मधील  विनरवील चौक, प्राधिकरण येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसदस्या शर्मिला बाबर, सह आयुक्त दिलीप  गावडे, मुख्य आरोग्य निरीक्षक बापुसाहेब गायकवाड आरोग्य कर्मचा-यांसह सहभागी झाले होते. राबविण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत सुमारे दोन टन  कचरा उचलण्यात आला.’ब’ क्षेत्रीय कार्यालय परिसरात प्रभाग क्र. 16 मधील आकुर्डी येथील डॉ. डी. पाटील महाविद्यालया मागील मोकळे मैदान,  कासनगर, एम. बी कॅम्प मुख्य रस्ता येथे झालेल्या या अभियानामध्ये नगरसदस्य मोरेश्‍वर भोंडवे, बाळासाहेब ओव्हाळ, प्रज्ञा खानोलकर, संगिता भोंडवे,  क्षेत्रीय अधिकारी. एस. डी. खोत, सहा. आरोग्याधिकारी के. डी. दरवडे, मुख्य आरोग्य निरीक्षक के. बी. पारोल, आरोग्य निरीक्षक उमेश कांबळे उपस्थित  होते.