Breaking News

1 कोटी 63 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सातारा, दि. 23, ऑगस्ट - अंगापूर तर्फ तारगाव (ता. सातारा) येथे बवाळू उपसा करून ती डंपरमधून वाहतूक करणा-या वाहनांवर कारवाई करण्यात  आली. तालुका पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर खळबळ उडाली असून, सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, पोलिसांनी  घटनास्थळी छापा टाकला असता जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर व वाळू असा एकूण 1 कोटी 63 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुका पोलिस ठाण्यामध्ये प्रोबेशनरी पोलिस उपअधीक्षक म्हणून एन. आर. पाराजे हे रुजू झाले आहेत. दि. 17  रोजी ते पोलिस कर्मचार्यांबरोबर गस्त घालत होेते. रात्री कारंडवाडी (ता. सातारा) येथे वाळूची अवैध वाहतूक करताना त्यांना 1 डंपर दिसून आला. संबंधित  चालकाकडे अधिक चौकशी केल्यानंतर ती वाळू अंगापूर तर्फ तारगाव येथून आणली असल्याचे समोर आले. त्यावरुन पोलिसांनी गावातील कृष्णा नदीच्या  पात्रात छापा टाकला असता वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, दि. 18 पुन्हा नागेवाडी, ता.सातारा येथे वाळूची बेकायदा वाहतुक  करणारे डंपर आढळून आले. यामुळे पोलिसांनी दोन्ही ठिकाणी कारवाईचा दंडूका उगारुन घटनास्थळावरुन पोलिसांनी तब्बल 1 कोटी 63 लाख रुपयांचा  मुद्देमाल ताब्यात घेतला.
अंगापूर तर्फ तारगाव येथे वाळू धंद्यावर पोलिसांचा छापा पडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन बहुतांशी मुद्देपाल  जप्त करुन पोलिस ठाण्यासमोर आणला. याबाबतचा सर्व अहवाल तयार करुन तो सातारा तहसीलदार कार्यालयाला पाठवला. त्यानंतर पुढील कारवाई  होणार आहे.