Breaking News

घारगावची ती प्राथमिक शाळा अखेर रात्री कोसळली......!

ग्रामस्थांचे अघोषीत दोन - तीन  तास नगर दौंड रस्त्यावर रास्तारोको; चक्का जाम आंदोलन  

श्रीगोंदा, दि. 31, ऑगस्ट - जिल्ह्यात निंबोडी ता. नगर जि.प.शाळेचा दुर्घटनेचा विषय ताजा असतानाच जिल्ह्यातीलच श्रीगोंदा तालुक्यातील मोठी बाजारपेठ आणि  नगर दौंड रस्त्यालगतच जिल्ह्यात प्रसिध्द असणा-या घारगाव गावची जि.प. शाळाही कालरात्री अचानक कोसळली. जिल्ह्यात शाळा पडण्याची ही दुसरी वेळ असुन प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे. सुदैवाने ही  घटना सोमवारी शाळा सुटुन गेल्यानंतर म्हणजे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली म्हणुन या  घटनेत कोणतीही जिवीतहानी किंवा जिवितास धोका पोहचला नाही. यामुळे तालुक्याची आणी गावावरील मोठी दुर्घटना टळली.
जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात पावसाने थैमान घातल्याने  आणि प्रशासनाच्या असलेल्या भोंगळ  कारभारामुळे तालुक्यातील ब-याच जुन्या शाळांची स्थीती  केव्हाही कोसळण्याची बनली आहे. अशीच घारगाव येथील स्वातंत्रपुर्व काळातील प्राथमिक शाळा मंगळवारी रात्री अचानक पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने मोठी दुर्घटना टळली.      
घारगाव प्राथमिक शाळेचा तर भोंगळ कारभार एवढा गलथान आहे कि, सदर शाळेची नोंद महसुल कडिल मिळणाया सातबारा उता-यावरही नाही आणी जि.प. व पं.समीती कडिल मालमत्ता रजिस्टरला शाळेचा उल्लेखच नाही . याच कारनाणे या शाळेचे निर्लेखन प्रशासन दरबारी गेल्या 1 ते दीड वर्षापासुन रेंगाळत पडुन आहे. म्हणुन या शाळेचे निर्लेखन आजतागायत झालेले नसुन यामुळे नवीन शाळा खोल्यांना मंजुरी मिळालेली नाही. शासनाची मुख्यत्वे ही मालकि जि.प. असताना देखील जि.प. ने आजतागायत शाळा त्यांच्या दप्तरी नोंदविण्यास असमर्थता दर्शविली आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावे संबंधित विभागांना केलेले आहेत.
याच शाळेचे बांधकाम निकृष्ट असल्याबाबत लेखी निवेदन प्रशासनाला व मंत्री महोदयांना दि.24 रोजीच सर्व पालक व ग्रामस्थांनी दिले होते. यानुसार दि 07 पासुन बेमुदत शाळा बंद ठेवण्याचे आवाहन ग्रामस्थांनी प्रशासनाला केलेले आहे. यातच दि 28 ला  निंबोडीची घटना घडल्याने शाळांचा आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार यातुन चव्हाट्यावर येत  आहे.
मुख्यमंत्र्यांकडे मंत्रीमंडळात  पाठपुरावा करणार - माजी मंत्री पाचपुते
या रास्तारोको च्यावेळी अचानक माजी मंत्री पाचपुते यांनीही भेट देऊन घटनेचा निषेध केला. अशा घटना घडने ही प्रशासकिय दृष्टीने अतिशय  खेदाची बाब असुन याबाबत सविस्तर माहीती मिळालेली असुन या घटनेचा आणी नवीन इमारती विषय योग्य तो  निर्णय मंत्रीमंडळातुन घेण्यास तयार आहोत.याबाबत ग्रामविकास मंत्र्यांशी व पालक मंत्र्यांशी दुरध्वनीवरुन चर्चा झालेली आहे. योग्य निर्णय लवकरच घेण्यात यईल असे आश्‍वासन माजीमंत्री पाचपुते यांनी उपस्थितांना दिले.
तालुक्यात घारगाव शाळेला प्रथम प्राधान्य देणार- सभापती लगड
या शाळेविषयी मागील आठवड्यातच मी स्वत: पाहणी करुन गेलो होतो. घारगाव काय आणी कोळगाव काय मी दोन्ही गावाचाच लेक आहे. यामुळे त्याबाबतचे व निर्लेखनाचे निवेदन पंचायत समीती स्तरावर दाखल झालेले आहे. त्याचा प्रस्ताव उचित कार्यवाहीसाठी जि.प.स्तरावर पाठविला असुन निर्लेखन ताबडतोब करुन नवीन शाळा खोल्या इमारती साठी प्रयत्न करणार आहे. असे प्रतिपादन सभापती लगड यांनी यावेळी दिले.