तमीळनाडू पुन्हा अस्थिरतेकडं
दि. 24, ऑगस्ट - जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या अण्णाद्रमुक या पक्षात फूट पडली होती. भाजपच्या पुढाकारानं अण्णाद्रमुकच्या दोन्ही गटांचं मनोमिलन झालं खरं; परंतु दोन दिवसांत पक्ष पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आला आहे. तमीळनाडूमध्ये माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम आणि विद्यमान मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या गटाची दिलजमाई झाल्याच्या दुसर्याच दिवशी तेथील राजकारणानं नवं वळण घेतलं आहे. पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांच्या मनोमिलनानंतर अण्णा द्रमुकमधील (एआयएडीएमके) संघर्ष संपला असं वाटत होतं; परंतु मंगळवारी सकाळी अण्णा द्रमुकचे उप महासचिव टीटीव्ही दिनाकरन यांच्या समथर्कांनी बंडखोरी केली. ज्या दिनाकरन यांची पक्षाच्या सरचिटणिसपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती, त्यांचीच आता 19 आमदारांनी भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच हे आमदार राजभवनात पोहचले. त्यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे विद्यासागर राव यांची दोन गटांना एक आणण्यात महत्त्वाची भूमिका होती. पनीरसेल्वम व पलानीस्वामी या दोन आजी-माजी मुख्यमंत्र्यांसोबत हात उंचावत असल्याचं राज्यपालांचं छायाचित्रही पकाशित झालं आहे. राज्यपालांनी राजकीय भूमिकेपासून दूर राहायचं असतं; परंतु आता विद्यासागर राव यांच्यामुळं शशिकला यांचं मुख्यमंत्रिपद कसं हुकलं आणि त्यांना नंतर तुरुंगात कसं जावं लागलं, हा सारा इतिहास अलिकडचा आहे. बंडखोर आमदारांनी राजभवनात येण्यापूर्वी मरीना बीच येथील जयललिता यांच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर हे बंडखोर आमदार ई. पलानीस्वामी सरकारविरोधातील अविश्वास ठराव घेऊन राजभवनात पोहचले. या वेळी त्यांनी राज्यपालांकडं पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्याची मागणी केली.
पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी हे दोन्ही गट एक आले. सविस्तर चर्चेनंतर दोन्ही गटांनी विलीनीकरणाची घोषणा केली. पनीरसेल्वम यांची पक्षाच्या निमंत्रकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे, तर पलानीस्वामी हे सह- निमंत्रक असतील. याशिवाय पनीरसेल्वम यांना तामिळनाडूत उपमुख्यमंत्रिपदही दिलं जाईल. जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांनी पक्षाची धुरा हाती घेतली. शशिकला गटाविरोधात पनीरसेल्वम यांनी बंडाचा झेंडा फडकावला. यानंतर पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. शशिकला यांना बेहिशेबी मालमत्तेपकरणी तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि एआयडीएमकेची अवस्था बिकट झाली. आमदारांनी विधीमंडळ पक्षनेतेपदी ई. पलानीस्वामी यांची निवड केली आणि पलानीस्वामी हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. पनीरसेल्वम आणि पलनीस्वामी गटातील संघर्ष टोकाला पोहोचला होता. पक्षाच्या निवडणूक चिन्हावरुन दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडं धाव घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी हे दोन्ही गट पुन्हा एक येतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. दोन्ही गटांमध्ये चर्चादेखील सुरू होती. शशिकला यांची चार महिन्यांपूर्वीच हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर दिनाकरन यांच्याविरोधात पोटनिवडणुकीत पैशाचं वाटप तसंच निवडणूक निर्णय अधिकार्यांना लाच देण्याचं पकरण त्यांच्या अंगलट आलं. तेव्हापासून दोन्ही गटांची एक येण्याची गती वाढली होती. अखेर काल या दोन्ही गटांनी एकत्र येण्याची घोषणा केली. दोन्ही गट एक आल्यानंतर तामिळनाडूत एआयएडीएमकेची ताकद वाढली होती. अम्मासाठी (जयललिता) आम्ही एक आलो, असं दोन्ही नेत्यांनी सांगितलं. तमिळनाडूत एकीकडं अण्णा द्रमुकचे दोन गट एकत्र आले असले, तरी पसिद्ध अभिनेते कमल हासन यांनी त्यावर टीका केली आहे. या घडामोडीमुळं तमिळ लोकांच्या डोक्यावर विदूषकाची टोपी आली आहे आणि तमिळ लोकांनी आता तरी जागृत व्हावं, असं त्यांनी म्हटलं होतं.
एआयएडीएमकेमध्ये पलानीस्वामी हे मुख्यमंत्री असतील. तर पनीरसेल्वम यांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार आहे. पलानीस्वामी यांच्या मंमिंडळात पनीरसेल्वम समथर्कांनाही संधी मिळणार आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. पक्षात दिवंगत नेत्या जयललिता यांच्याकडं कायमस्वरुपी महासचिवपद असेल, यासाठीही पस्ताव मांडला जाईल. त्यामुळं महासचिवपदावर शशिकला आणि त्यांच्या समथर्कांना विराजमान होता येणार नाही. दोन्ही गटांमधील समन्वय वाढवण्यासाठी सल्लागार समितीदेखील स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये दोन्ही गटांमधील नेत्यांचा समावेश असेल. एकीकडं असं चित्र असताना आणि भाजपनं दोन्ही गटांवर आपलं जाळ टाकलं असताना दिनाकरन यांच्या गटाच्या 19 आमदारांनी थेट सरकारच्या विरोधात पवित्रा घेतला आहे. त्यांना द्रमुकच्या एम. के. स्टॅलिन यांची ही मदत मिळण्याची शक्यता आहे. तमीळनाडूच्या राजकारणात रजनीकांत यांनीही सक्रिय होण्याची तयारी केली आहे. त्यांनी अजून आपले पत्ते खुले केले नसले, तरी कमल हासन ज्या पक्षात त्याच्या विरोधात रजनीकांत असतील, असा अंदाज आहे. रजनीकांत सध्या तरी भाजप किंवा अन्य पक्षाशी दोन हात दूर राहून स्वतः चा पक्ष काढण्याची शक्यता आहे. पलानीस्वामी आणि पन्नीरसेल्वम गटांत झालेलं विलीनीकरण हा भाजपच्या रणनीतीचाच भाग मानला जातो. जयललिता यांच्या मृत्यूनंतर तामीळनाडूमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. सत्ताधारी अण्णा द्रमुकमध्ये पडलेल्या फुटीमुळं अन्य पक्ष फायदा घेण्याचा पयत्न करीत होते. अण्णा द्रमुकच्या हातून सत्ता जाऊ नये, म्हणून पंतपधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेत तामिळनाडूतील सत्ताधारी दोन गटांमध्ये समझोता घडवून आणला; परंतु हा समझोता तात्कालिक ठरला असून सरकार अल्मपतात आलं आहे. राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव मांडण्याची परवानगी दिली, तर सरकार कोसळेल. त्यामुळं परवानगी न देता सरकार वाचविण्याचा भाजपचा प्रयत्न असेल.