गर्दे वाचनालयात शाळेवर बोलु काही संगीत कार्यक्रम
बुलडाणा, दि. 27, ऑगस्ट - गर्दे वाचनालय, बुलडाणाच्या शताब्दी वर्षानिमीत्त कलादर्पण अकॅडमी बुलडाणा व गर्दे वाचनालय बुलडाणा यांच्या सयुक्त विद्यमाने दि 23 ऑगस्ट रोजी गर्दे वाचनालयाच्या सभागृहात शाळेवर बोलु काही हा संगीत कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या भावविश्वातील एक एक पैलु घेवुन त्यावर अक्षय जोशी यांनी नवीन गीत रचना करुन संगीत दिलेले असुन राजेश आढे व वैष्णवी रिंढे यांनी श्री गजानन जिवाची तार रे, मन माझे, आला संडे, वंदे वंदे मातरम, शाळा माझ्या मनी इत्यादी गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण करुन उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब कविमंडन हे होते.कार्यक्रमाचे उदघाटन डॉ प्रमोद देशपांडे यांनी केले.यावेळी गर्दे वाचनालयाचे पदाधिकारी बाळासाहेब देशपांडे, उदय देशपांडे, आशुतोष वाईकर, पत्रकार अरुण जैन हे उपस्थित होते. याप्रसंगी अरुण जैन यांना उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल गर्दे वाचनालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, निवेदन व आभार प्रदर्शन अर्चना देव यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेमीनाथ सातपुते, कुळकर्णी, बल्लाळ, संजय रिंढे, राम जाधव, आनंद साबदे, संदिप देशपांडे, सुभाष भालेराव यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाला शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, पालक, रसिक उपस्थित होते.