राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्या देशवासियांना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा
नवी दिल्ली, दि. 07 - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना ट्विटच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत . देशात आज रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा केला जात आहे . प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी आपल्या वाळू शिल्पातून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या भावाच्या सुरक्षेसाठी आजच्या दिवशी त्याला हेल्मेट भेट म्हणून देण्याचे आवाहन करणारे शिल्प त्यांनी साकारले आहे .
देशाचे रक्षण करणा-या जवानांनाही स्थानिक महिलांनी राख्या बांधून त्यांचा रक्षाबंधनाचा सण साजरा केला. जम्मू-काश्मीर व वाघा सीमेवर महिलांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना राख्या बांधल्या. तर, बांगलादेश व इंडो-तिबेटीयन सीमेवरही तेथील सुरक्षा रक्षकांना महिलांनी राख्या बांधून हा सण साजरा केला. झारखंडमधील आदिवासी महिलांनी झाडांना राख्या बांधत झाडे वाचवण्याची शपथ घेतली.