Breaking News

कर्नाटकमध्ये गेलेले काँग्रेसचे आमदार 9 दिवसानंतर गुजरातमध्ये परतले

अहमदाबाद, दि. 07 - कर्नाटकमध्ये गेलेले काँग्रेसचे 44आमदार आज 9 दिवसानंतर कडक सुरक्षा व्यवस्थेत अहमदाबादमध्ये परतले. या आमदारांची राहण्याची  व्यवस्था अहमदाबादजवळील एका रिसॉर्टमध्ये करण्यात आली आहे.
गुजरातमधील राज्यसभेच्या 3 जागांसाठी होणा-या निवडणुकीत मते फुटू नयेत म्हणून काँग्रेसने या आमदारांना बंगळुरूला पाठवले होते. गुजरातमधील राज्यसभेच्या 3  जागांसाठी उद्या 8 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. हे आमदार 29 जुलै पासून बंगळूरूच्या इगलटॉन रिसॉर्टमध्ये वास्तव्यास होते.
सर्व आमदार कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी.के. शिवकुमार यांच्या रिसॉर्टमध्ये वास्तव्यास होते. शिवकुमार यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात 10  कोटी रुपये जप्त केले आहेत. 8 ऑगस्ट रोजी होणा-या राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आमदारांच्या व्यवस्थेची जबाबदारी शिवकुमार यांच्यावर आहे.