Breaking News

गोदावरी नदी प्रदूषणाप्रकरणी नांदेडच्या महापौर आणि आयुक्तांवर गुन्हा दाखल

नांदेड, दि. 07 - गोदावरी नदी प्रदूषणास नांदेडच्या महापौर आणि आयुक्तांना जबाबदार धरले असून या बाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे  पर्यावरणमंत्री कदम यांनी पुर्वी गोदावरी नदीची पाहणी केली त्यावेळी शहरातील नाले नदीत सोडल्याचे आढळले नंतरही तपासणीत पाणी दुषित असल्याचे आढळले  होते. यामुळे पर्यावरण अधिका-यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापौरांसह आयुक्त आणि एका उपायुक्तांवरही प्रदूषण कायद्यान्वये जिल्हा  न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे़ .मात्र त्यांनी नदी शुध्दीकरणाचे प्रतिज्ञापत्र दिल्याने त्यांना अटक झाली नाही.