Breaking News

हिरोशिमावरील अणुबॉम्ब हल्ल्याला 72 वर्ष पूर्ण

नवी दिल्ली, दि. 07, ऑगस्ट - 1945 मध्ये दुस-या महायुद्धावेळी अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा शहरावर केलेल्या अणुबॉम्ब हल्ल्याला  72 वर्ष पूर्ण झाली.  येथील पीस मेमोरियल पार्कमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात 80 देशांच्या  प्रतिनिधींसह 50 हजारापेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते.
हिरोशिमाच्या मेयर कजुमी मत्सुई यांनी जगभरातील प्रत्येक व्यक्तीला अणुबॉम्बच्या वापरापासून दूर राहण्याचे आवाहन केले. हल्ल्यात ठार झालेले नागरिक, जपानची  संस्कृती आणि बॉम्ब हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा उल्लेख मत्सुई यांनी शांततेचा संदेश देतांना केला. जग अणवस्त्रमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न  करण्याची विनंती मत्सुई यांनी जपान सरकारला केली.