Breaking News

दहशतवाद्यांना अर्थसाह्य केल्याप्रकरणी शब्बीर शाहच्या सहकार्‍याला 14 ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ कोठडी

नवी दिल्ली, दि. 07, ऑगस्ट - दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी फुटीरतावादी नेता शब्बीर शाह याचा सहकारी अस्लम वाणी याला दिल्लीतील एका  न्यायालयाने 14 ऑगस्टपर्यंत सक्तवसुली संचालनालयाची कोठडी सुनावली.
काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणा-या संघटनांना आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने आज श्रीनगर येथून वाणीला अटक केली. दरम्यान  फुटीरतावादी नेता शब्बीर शाह याच्या कोठडीच्या कालावधीत दिल्लीतील न्यायालयाने सहा दिवसांची वाढ केली आहे. सक्तवसुली संचालनालयाने याबाबतची मागणी  न्यायालयाकडे केली होती. ती मागणी मान्य करून न्यायालयाने शाहच्या कोठडीच्या कालावधीत वाढ केली.