Breaking News

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या उपोषणाचा 11 वा दिवस

भोपाळ, दि. 07, ऑगस्ट - सरदार सरोवर धरण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी धार येथे उपोषणाला बसलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा  पाटकर यांचे 11 व्या दिवशीही उपोषण सुरू आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र श्रीमती पाटकर आपल्या मागण्यांवर  ठाम आहेत.
त्या म्हणाल्या की, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होत नाही. तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल मात्र मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी  उपोषण थांबवणार नाही, असे त्यांनी नमूद केले.