राष्ट्रपतीपदाची उमेदवारी अडवाणींनी स्वतः च नाकारली - स्वामी चिन्मयानंद
नवी दिल्ली, दि. 25 - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपले नाव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित न करण्यास सांगितले होते, असा दावा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांनी केला आहे. आयोध्येतील राम मंदीर प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी केली जात असल्याने अडवाणी यांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनण्यास नकार दिला होता, असे त्यांनी सांगितले.
त्यामुळे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून अडवाणी यांच्या नावाची घोषणा न झाल्याने ते उपेक्षित राहिले असे म्हणणे चुकीचे ठरेल, असेही ते म्हणाले. भारतीय जनता पक्षासाठी आयोध्येतील राम मंदिरही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाने जरीही हा प्रश्न चर्चेतून सोडवण्यास सांगितला असला तरी समोरील पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्याने या प्रश्नी अद्याप कोणताही मार्ग काढण्यात आलेला नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे आता सरकारने राम मंदिर निर्मितीचा प्रस्ताव मांडून या प्रकरणी कायदा तयार करायला हवा, असे ते राम मंदिर निर्मितीबाबत बोलताना ते म्हणाले.