कलाकारांच्या राजकारणातील प्रवेशामुळेच तामिळनाडू भ्रष्ट राज्य - सुब्रमण्यम स्वामी
नवी दिल्ली, दि. 25 - कलाकारांच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तामिळनाडूच्या परंपरेमुळेच येथील राजकारण भ्रष्टाचाराने बरबटले आहे, अशी टीका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. सुपरस्टार रजनीकांत हे राजकारणात प्रवेश करणार याबाबत उलट-सुलट चर्चा रंगत असून त्या पार्श्वभूमीवर स्वामी यांनीही अशा प्रकारे टीका करणारे ट्विट केले आहे.
कलाकारांच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या तामिळनाडूच्या परंपरेमुळेच येथील राजकारण भ्रष्टाचाराने बरबटले आहे. त्यांची भाषणेही संहितेप्रमाणे कोणीतरी लिहिलेली असतात. त्यांच्याकडे काळापैसा असतो. त्यामुळेच तामिळनाडू राज्याला भ्रष्ट राज्यांच्या यादीत स्थान आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.