Breaking News

भाजपच्या कार्यकाळात दुर्बल घटकांच्या जगण्याच्या पद्धतीत सुधारणा - मनेका गांधी

पलवल, दि. 25 - भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात दुर्बल घटकांच्या जगण्याच्या पद्धतीत सुधारणा झाली आहे, असे  प्रतिपादन केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तीन वर्षाच्या कारकिर्दीत अनेक योजना सुरु  करण्यात आल्या आहेत . या योजनांचा सर्वात जास्त फायदा दुर्बल घटकांना झाला. पंतप्रधान मोदी यांच्या योजनांविषयी जनसामान्यांना माहिती देण्याकरिता त्या  पलवल येथे आल्या होत्या. त्यावेळी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, सरकारने आपल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात 92 योजना सुरु केल्या आहेत. कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेशी संवाद साधून त्यांना पंतप्रधान मोदी  यांनी सुरु केलेल्या योजनांविषयीची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले .
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशातील घराघरात शौचालयाची निर्मिती करण्यात आली. जनधन योजनेअंतर्गत अनेक जणांची बँक खाती उघडण्यात आली. प्रधानमंत्री  मुद्रा योजनेअंतर्गत 3.2 लाख कोटी रु. चे कर्जवाटप करण्यात आले, असे त्यांनी नमूद केले.