Breaking News

ऑस्ट्रेलियन ओपन : अंतिम फेरीत श्रीकांतपुढे चेन लाँगचे आव्हान

सिडनी, दि. 25 - जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानावर असलेल्या चीनच्या चेन लाँगने आज ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत  धडक मारली.विजेतेपदासाठी चेनची झुंज भारताच्या किदम्बी श्रीकांतशी होणार आहे. चेनने आज झालेल्या सामन्यात कोरियाच्या ली ह्यूनला 26-24, 15-21,  21-17 असे पराभूत केले. या सामन्यातील पहिला गेम अतिशय अटीतटीचा झाला. त्यात चेनने विजय मिळवला. त्यानंतर दुसरा गेम ह्यूनने जिंकला. पण तिस-या  गेममध्ये लौकिकाला साजेसा खेळ करून चेनने 1 तास 8 मिनिटे चाललेला सामना जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली.