पोलीस उपअधीक्षक पंडित यांची हत्या योजनाबद्ध - उपमुख्यमंत्री निर्मल सिंग
श्रीनगर, दि. 25 - पोलीस उपअधीक्षक मोहम्मद अयुब पंडित यांची योजनाबद्ध हत्या करण्यात आली आहे, असे जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी सांगितले. त्यांच्या हत्येला जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. निर्मल सिंग यांनी आज मोहम्मद पंडित यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली.
ते म्हणाले की, पंडित हे एक शूर आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी होते. आम्ही पंडित यांना परत आणू शकत नाही. मात्र सरकार त्यांच्या कुटुंबियांना वा-यावर सोडणार नाही. आम्ही कायम त्यांच्यासोबत आहोत, असे त्यांनी सांगितले.