Breaking News

शिवसेनेतील वाद चव्हाटयावर

औरंगाबाद, दि. 25 - कन्नड तालुक्यात गावं हरवलाची तक्रार पोलिसांत देण्यात आली असून ती शोधून देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवसेनेचे  खासदार चंद्रकांत खैरे यांच्या खासदार निधीमधून खापेश्‍वर, झाडेगावतांडा, सावरखेडा, मांडवा, शिंदेवाडी आणि घोडेगाव या गावात काम करण्यात आल्याचे  दाखवण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात अशा नावाची गाव जिल्ह्यात नाहीत.
मग निधी कोणत्या गावासाठी मंजूर करण्यात आला, असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. खासदारांनी मात्र निधी मंजूर करुन तो खर्च देखील केला आहे. याप्रकरणानंतर  कन्नड तालुक्यातीही गावं हरवली आहेत, असे सांगत रवींद्र एकनाथ मोतींगे यांनी त्याबाबत तक्रार दाखल केली आहे. हरवलेली गावं शोधून द्यावी,
यासाठी कन्नड पोलिसात अर्ज करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासुन कन्नडचे शिगवसेना अमदार जाधव आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात चांगलाच वाद  निर्माण होत आहे.जाधव यांनी खैरे यांच्यावर खासदार निधीच्या गैर वापराचा आरोप केला आहे.आपल्यावर खोटे आरोप करून पक्षातील जिल्हयाबाहेरचे लोक जाधव  यांना हातशी धरून आपल्याशी राजकीय खेळी करत असल्याचा खैरे यांचा आरोप असून त्यांनी स्पष्ट उल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख पालकमंत्री रामदास कदम  यांच्यावर असल्याचे दिसून येते .आपल्यावर अशा पक्षांर्तगत शत्रुचा काहीही परिणाम होणार नसून या पुढेहि निवडणूकानंतर आपणच खासदार राहणार असल्याचे  त्यांनी जाहिर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर गाव हरवल्याच्या तक्रारिची जोरदार चर्चा कन्नडमध्ये आहे.