Breaking News

टेलीफोन एक्सचेंज प्रकरणातील आरोपींच्या खात्यावर लाखोंची उलाढाल

लातूर, दि. 25 - लातुरातील गैरकायदेशीर टेलीफोन ए प्रकरणातील पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींच्या बँक खात्यावर लाखो रुपयांची उलाढाल असल्याचे  निदर्शनास आले असल्याने पोलिसांनी हे प्रकरण अधिक गांभिर्याने घेतले असून आतापर्यंत याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यातील दोघांच्या  पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली असून त्यांची नावे शंकर बिरादार व महेश मळभागे अशी आहेत.