मागचा दरवाजा उघडा ठेवून झोपणे महाग पडले
नांदेड, दि. 25 - उकाड्या्त होवून आपल्या घरातील मागचा दरवाजा उघडा ठेवून झोपणे एका कुटंंबाला महाग पडले चोरट्याने ही संधी साधुन2 लाख 21 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला मात्र एका आठवडयातच पोलिसांनी चोराला पकडले. आलेवाड कुटुंंबिय उकड्याने परेशान होवून आपल्या घरातील मागचा दरवाजा उघडा ठेवून झोपले असताना रात्री 12 ते 3 या दरम्यान कोणीतरी चोरट्यांनी घरात प्रवेश करुन घरातील सोन्या चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख 60 हजार रुपयाचा ऐवज चोरुन नेला होता. याबाबत भाग्यनगर पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरिक्षक संगीता कदम यांच्याकडे होता. पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा यांनी भाग्यनगर पोलीसांना दिलेल्या विविध सुचनांच्या आधारावर काम करत त्यांनी पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे यांच्या नेतृत्त्वात पोलीस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार, पोलीस कर्मचारी सुभाष आलोने, विलास कदम, वैजनाथ पाटील, सचिन गायकवाड, बालाजी सातपुते, जाकीर पठाण आणि कोल्हे यांचे एक पथक तयार केले. या पथकाने भरपूर मेहनत घेऊन हिंगोली गेट भागात राहणारा संजू किशन गुडमलवार यास पकडले. त्याने आलेवाड यांच्या घरात केलेली चोरी मि आणि माझ्या साथीदारांनी केल्याचे मान्य केले. पोलीसांनी त्याच्या कडून 2 लाख 21 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. गुडमलवारला न्यायालयात हजर केले. न्यायाधीश शिरसाठ यांनी या चोरट्याला 5 दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.