पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना जाहीर
बुलडाणा, दि. 24 - प्रधानमंत्री कृषि पीक विमा योजनेतंर्गत पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2017-18 करीता जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतील विम्याचा लाभ मृग बहारामध्ये डाळींब या फळपिकास देण्यास मान्यता देण्यात आली आहे. योजनेद्वारे कमी/ जास्त पाऊस, पावसाचा खंड व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकर्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यात येते.
अधिसुचीत क्षेत्रात अधिसुचीत फळपीक घेणारे (कुळाने, भाडेपट्टीने शेती करणार्या शेतकर्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जे शेतकरी विविध वित्तीय संस्थेकडून पीक कर्ज घेतात अशा कर्जदार शेतकर्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकर्यांना ऐच्छिक राहणार आहे. फळपीक निहाय निर्धारीत केलेले हवामान धोके लागू झाल्यावर नुकसान भरपाई देय राहणार आहे. विमा क्षेत्राचा घटक हा महसूल मंडळ असणार आहे. डाळींब फळपिकाकरीता विम्याची संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 1 लक्ष 10 हजार असणार असून विमा हप्ता प्रती हेक्टरी 5500 राहणार आहे.
बँकेकडून अधिसूचित फळ पिकांसाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असलेले शेतकरी यांना तसेच बिगर कर्जदार शेतकर्यांनी विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची मुदत डाळींब पिकाकरीता 14 जुलै आहे. फळबाग उत्पादक शेतकर्यांनी बँकेशी किंवा क्षेत्रीय अधिकारी असलेल्या तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.
या महसूल मंडळात डाळींब फळपिकासाठी असणारा विम्याचा लाभ -
चिखली तालुका : पेठ, चिखली, चांधई, हातणी, अमडापूर, शेळगांव आटोळ, बुलडाणा : बुलडाणा व धाड, मोताळा : शेलापूर, बोराखेडी, मोताळा, धा.बढे. खामगांव : हिवरखेड व काळेगांव, दे.राजा : दे.राजा, अंढेरा, दे. मही, तुळजापूर, मेहुण राजा, जळगाव जामोद : जामोद, मलकापूर : नरवेल व जांभुळधाबा.