Breaking News

सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने पडताळणी करण्याचे आवाहन

नाशिक, दि. 25 - कर्मचार्‍यांना सेवानिवृत्ती वेतन विहीत वेळेत मिळण्यासाठी व वेतन पडताळण अशी प्रकरणे प्रलंबित राहू नये यासाठी सेवानिवृत्त झालेल्या आणि  निकटच्या कालावधीत सेवानिवृत्त होणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांची सेवापुस्तके वेतन पडताळणीसाठी सहसंचालक लेखा व कोषागरे नाशिक विभाग यांच्या कार्यालयात  सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व आहरण आणि संवितरण अधिकार्‍यांनी वेतन पडताळणी करून सेवा पुस्तकातील आक्षेत वेळेत पुर्ण करणे आवश्यक आहे. त्यांनी आपल्या आस्थापनेवरील सर्व  सेवापुस्तकांचा आढावा घेऊन सेवापुस्तके पडताळून घ्यावीत. तसेच एकूण मंजूर पदे, कार्यरत पदे, रिक्त पदे, वेतन पडताळणी झालेल्या आळणी न झालेल्या  सेवापुस्तकांची संख्या विहीत नमुन्यात 15 जुलै पर्यंत सादर करावी, असे आवाहन सहसंचालक बाळासाहेब घोरपडे यांनी केले आहे.