चोपडीत सोमवारी 24 वी दुष्काळी पाणी संघर्ष परिषद
सांगली, दि. 25 - राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्रातील 13 कायम दुष्काळी तालुक्यातील शेतकर्यांची पाणी संघर्ष परिषद सोमवार दि. 26 जून रोजी चोपडी (ता. सांगोला) येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती या पाणी संघर्ष परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी दिली.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यातील कृष्णा खोर्यातील 13 कायम दुष्काळी तालुक्यांना टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे हक्काचे पाणी मिळावे, या हेतूने क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी दि. 11 जुलै 1993 रोजी आटपाडी येथे पहिली पाणी संघर्ष परिषद घेऊन या आंदोलनाला सुरूवात केली होती. या पाणी संघर्ष परिषदेला यंदा 24 वर्षे पूर्ण होत आहेत.
नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली शेतमजूर, शेतकरी व कष्टकरी संघटना यांनी पाणी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून तीव्र लढा उभारल्यामुळेच राज्य शासनाला कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करणे भाग पडले होते. आजवर केलेल्या विविध आंदोलने व मोर्चांमुळेच या योजनेचे पाणी गत दोन वर्षात आटपाडी व सांगोला या शेवटच्या दोन तालुक्यात पोहोचले आहे.
आता पुन्हा निर्णायक लढा उभारण्यासाठी या पाणी संघर्ष परिषदेचे आयोजन केले आहे. त्यात या योजनेच्या मुख्य व पोटकालव्यांची कामे अद्याप बाकी आहेत, त्यासाठी तात्काळ निधी देण्यात यावा, टेंभू व म्हैसाळ या दोन उपसा जलसिंचन योजनांच्या सांगोले शाखा, उरमोडी व निरा देवधर योजनांना पंतप्रधान कृषी सिंचन विकास योजनेच्या माध्यमातून निधी मिळावा, समन्यायी पाणी वापर पध्दतीने दुष्काळी तालुक्यांना निधी देण्यात यावा व पाण्याचे दर माङ्गक ठेवावेत, या व अन्य विविध प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.
याआधीच्या पाणी संघर्ष परिषदा आटपाडी येथे झाल्या आहेत. मात्र यंदा प्रथमच ही पाणी संघर्ष परिषद सांगोला तालुक्यातील चोपडी येथे दुपारी एक वाजता आयोजित केली आहे. गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या पाणी संघर्ष परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर. एस. चोपडे, डॉ. बाबूराव गुरव, प्रा. बाळासाहेब नायकवडी, ऍड. सुभाष पाटील, प्रा. शिवाजीराव काळुंगे, महादेव देशमुख, चंद्रकांत देशमुख, प्रा. दत्ताजी जाधव, ऍड. बाळासाहेब बागवान व प्रा. विश्वंभर बाबर आदी उपस्थित राहणार असल्याचेही वैभव नायकवडी यांनी सांगितले.