Breaking News

अमरनाथ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर पार पडली सुरक्षा दलाची उच्चस्तरीय सुरक्षा बैठक

श्रीनगर, दि. 25 - काश्मीरमधील अमरनाथ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी नरगौटामध्ये सुरक्षा दलाकडून उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेण्यात आली. व्हाइट नाइट  कॉर्पच्या मुख्यालया आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य, लेफ्टनंट ए.के. शर्मा यांच्यासह पोलीस व  लष्करातील काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवादी हल्ल होण्याची शक्यता वर्तवली गेली असून त्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक बोलवण्यात  आली होती. यावेळी येथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक यात्रेकरू व अधिका-याने या काळात सजग राहणे आवश्यक असल्याने सावधागिरी  बाळगण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी सांगितले की, लष्कर व सुरक्षा दलाच्या अन्य तुकड्यांना दक्षिणकडील पीर पंजाल पर्वतरांगांच्या परिसरात तैनात  करण्यात आले असून याशिवाय सुरक्षा दलाला स्थानिक प्रशासनाच्या मदतीने ही यात्रा शांततापूर्ण पद्धतीने पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.